Jalna Districtजालना जिल्हाराज्य

हॉटेल मध्ये झालेला सिलेंडरचा स्फोट;कसा झाला पहा!

जालना- परतूर शहराच्या जवळच असलेल्या सेलू रस्त्यावरील श्रद्धा बार आणि रेस्टॉरंट मध्ये आज सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाला. सुदैवाने या स्फोटामध्ये जीवित हानी झाली नाही. सुरुवातीला गॅसची गळती सुरू झाल्याचे लक्षात आल्यानंतर कामगार आणि ग्राहक बाहेर पडले आणि काही क्षणातच सिलेंडरचा स्फोट झाला. अचानक झालेल्या स्फोटामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते परंतु स्फोट होणार याचा अंदाज आल्याने अनेक नागरिकांनी आजूबाजूला उभे राहून हा काळजाचा थरकाप उडविणारा हा अनुभव पाहिला. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेत येऊन आग आटोक्यात आणली.

एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

Related Articles