वानराच्या पिल्ल्याचे डोके अडकले तांब्यात!
जालना-वानर ही प्राण्याची जात ही सामान्यांसाठी फारशी काही फायदेशीर नाही, परंतु उपद्रवी मात्र आहे. असे असले तरी माणसांची वन्य जातीच्या प्राण्यांवर असलेली दया अजूनही कमी झालेली नाही. याचेच एक उदाहरण भोकरदन तालुक्यातील सावंगी येथे पाहायला मिळाले.
या गावांमध्ये वानरांचे भरपूर कळप आहेत आणि त्यांच्या उपद्रवामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत .याच दरम्यान माय-लेकाची वानराची एक जोडी गावभर फिरत असताना पिल्याला तहान लागली आणि या पिल्याने घरासमोर असलेल्या एक तांब्या मध्ये पाणी पिण्याचा प्रयत्न केला आणि आपले डोके घातले आणि हे डोके तांब्या मध्ये अडकून बसले. काही केल्या हे डोके बाहेर निघेना. शेवटी या पिल्याची आई दोन- तीन दिवस गावभर तांबे अडकलेल्या पिल्याला घेऊन फिरत राहिली. गावकऱ्यांनी ही वानराला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र ते हाती लागले नाही. शेवटी वनविभाग आणि वन्यजीव प्रेमींच्या माध्यमातून काल या वानराला पकडण्यात आले आणि पिंजऱ्या मध्ये अडकवून वन्यजीव प्रेमी समाधान गिरी यांनी या पिल्याला तांब्या मध्ये अडकलेल्या डोक्यातून मुक्त केले. डोके आणि तांबे वेगवेगळे होताच पिंजऱ्याच्या बाहेर असलेल्या ग्रामस्थांनी देखील आनंद व्यक्त केला. या अशा विचित्र परिस्थिती मधून एखाद्या शस्त्रक्रिये प्रमाणे वानराचे पिल्लू ही मुक्त झाले होते. त्यामुळे या पिल्याला झालेला आनंद आणि या पिल्ल्याचा आनंद पाहून “समाधान” च्या चेहर्यावरील आनंद हा लक्षणीय होता.
एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com