गांधी घराण्याला त्रास देण्याचे षड्यंत्र- काँग्रेसचा आरोप
जालना -काँग्रेस पक्षाने देशासाठी आपले बलिदान दिले आहे ,वेळ प्रसंगी नेहरूंनी कारावासही भोगला आहे. तीच परंपरा पुढे गांधी घराण्याने सुरू ठेवली. काँग्रेसच्या सर्वेसर्वा श्रीमती सोनिया गांधी या आजारी असतानाही केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या सक्तवसुली संचालनालय संचालनालयाने(इडी) त्यांना नोटीस पाठविली आहे. हे केवळ त्यांना त्रास देण्याचे षड्यंत्र आहे. असा आरोप काँग्रेस पक्षाचे जालन्याचे प्रभारी तथा माजी आमदार नामदेव पवार यांनी केला आहे
हेरॉल्ड या वृत्तपत्राला निधी दिल्याचा आरोप ठेवून त्याच्या चौकशीसाठी इडीने गांधी घराण्याला नोटीस पाठवली आहे. त्यामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा समावेश आहे.केवळ विरोधक आहेत आणि त्यांना त्रास देण्याच्या हेतूने हे षड्यंत्र रचले असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला.यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, शहराध्यक्ष शेख महेमुद, जाफराबाद तालुकाध्यक्ष सुरेश गवळी,आदींची उपस्थिती होती.
एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com