जालना मंठा रस्त्यावर अल्टो कारला अपघात एक ठार
वाटूर फाटा-जालना ते मंठा रस्त्यावर पोखरी पाटीजवळ आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अल्टो कार आणि ट्रक यांचा अपघात झाला आणि यामध्ये नांदेड येथील देशमुख कुटुंबापैकी एक जण ठार झाले आहे नांदेड वरून औरंगाबाद कडे जाणाऱ्या रस्त्यावर पोखरी पाटीजवळ एक ट्रक (क्र. एम एच 15-इ जी 32 31 )पंचर झाला म्हणून रस्त्याच्या बाजूला उभा होता. या ट्रकला नांदेड कडून औरंगाबाद कडे जाणाऱ्या अल्टो कार क्रमांक एम एच -26 बीसी 14 65 धडक दिली. ही धडक एवढी भयानक होती की कारच्या समोरच्या भागाचा चेंदामेंदा झाला आहे .
गाडी मालकाच्या नावावरून सदरील गाडी ही नांदेड येथील सुनील वामनराव देशमुख यांची असल्याचे समजते. सुनील देशमुख यांची पत्नी आणि त्यांची मुलगी असे तिघेजण औरंगाबादला जात होते. दरम्यान या अपघातामध्ये देशमुख यांच्या बाजूला बसलेल्या त्यांच्या पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला आहे, तर मुलगीही किरकोळ जखमी झाली आहे .परंतु सुदैवाने सुनील वामनराव देशमुख हे सुस्थितीत आहेत. स्थानिक परिसरातील नागरिकांनी श्रीमती देशमुख यांना वाटूर येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे.
एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com