मंदिरातील घंटा चोरी करणारे २ सराईत आरोपी जेरबंद: स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही
भोकरदन-हसनाबाद हद्दीतील पिंपरी फाटा गणपती मंदिरातील घंटा चोरांनी बुधवार दिनांक 15 रोजी चोरली होती त्यावरून पोलीस स्टेशन हसनाबाद येथेगु कलम 379, 34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांना तांत्रिक पुराव्याच्या आधारे व गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, हा गुन्हा अभिलेखावरील सराईत आरोपी बाबासाहेब नारायण वांगे उर्फ वांग्या वय 33 वर्ष राहणार संजय नगर जालना याने ,त्याचा साथीदार माधव उत्तम घाडगे वय 40 वर्ष राहणार लालबाग जालना याच्या मदतीने केला आहे.
यावरून दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीस गेलेले घंटा इतर दोन घंटा, एक समई ,पक्कड, हातोडी व गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल असा एकूण 71,100 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास हसनाबाद पोलीस करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या नेतृत्वात, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, सम्युल कांबळे, गोकुळसिंग कायटे, संजय मगरे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, सुधीर वाघमारे, रुस्तम जेवाळ, सचिन सहाणे, कैलास चेके, सुरज साठे,महीला अमलदार चंद्रकला शाडमलू यांच्या पथकाने केली.
एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com