रेल्वे वाहतूक सुरळीत ;भारत बंद चा परिणाम नाही
जालना -केंद्र सरकारने अग्निपथ ही योजना सैन्यभरती संदर्भात आपली आहे. त्याची अंमलबजावणी ही लवकरच सुरू होणार आहे. यासंदर्भात आज सोमवार दिनांक 20 रोजी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने भारत बंदची हाक दिली होती आणि या दरम्यान रेल्वे स्थानकावर काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्तही तैनात केला होता.
इतर राज्यात रेल्वेची होणारी जाळपोळ लक्षात घेता स्थानिक रेल्वे प्रशासनाने याबाबत पोलिसांना माहिती दिली होती. त्यामुळे कदीम जालना पोलीस सकाळपासूनच स्थानकावर बंदोबस्तासाठी हजर झाले होते .दरम्यान रेल्वे स्थानकावर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आणि प्रवासी देखील सुरक्षित आहेत त्यांच्याही मनात कोणतीही भीती नसल्याची माहिती कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री. सय्यद यांनी दिली .दरम्यान काही अनुचित प्रकार घडला तर पोलिस यंत्रणाही सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबत अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले आहे आणि ते देखील सर्व तयारीनिशी आले असल्याचेही ते म्हणाले .महत्त्वाच्या रेल्वे म्हणजे दुपारी नांदेड अमृतसर ,नांदेड मुंबई ,अमृतसर नांदेड ,या रेल्वेच्या वेळा होत्या आणि त्या दरम्यान पोलिस बंदोबस्त तैनात होता. कोणता अनुचित प्रकार घडलेला नाही.
एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com