Jalna Districtजालना जिल्हा

योगसाधनेमुळे लवचिकता आणि स्थैर्य मिळते ;जिल्हाधिकारी डॉ .राठोड

जालना-योगसाधनेमुळे जीवनात लवचिकता आणि स्थैर्य निर्माण होते आणि या दोन्ही गोष्टी आत्मविश्वास वाढवतात .त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात ध्येय गाठण्यासाठी योगसाधनेचा फायदा होतो. त्यासोबतच योग म्हणजे समाधी, जोड, आणि सामंजस्य असा तिन्हींचा संगम आहे. त्यामुळे प्रत्येकाने योगासने करावीत, असे आवाहन जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या या योगासन शिबिरासाठी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदाल, पोलिस अधिक्षक अक्षय शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर प्रकल्पप्रमुख संगीता लोंढे, शिक्षणाधिकारी मंगला धुपे, यांच्यासह जिल्हा परिषदेतील कर्मचारी अधिकारी हे तर उपस्थित होतेच परंतु सामान्य जनतेतील शिक्षक, विद्यार्थी, आणि अन्यही नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने डॉ. विवेक खतगावकर राष्ट्रीय आरोग्य मिशन चे प्रकल्प प्रमुख श्री. शेळके यांच्यासह बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती. योग गुरु लोणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थितांना योगाचे धडे दिले.

 

एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button