न्यायाधीशही रंगले योग दिन साजरा करण्यात
जालना -गेल्या महिन्याभरापूर्वी जालना जिल्हा व सत्र न्यायालयात अनेक न्यायाधीश नवीन बदलून आलेले आहेत. या सर्व न्यायाधिशांनी आज जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवून आनंद लुटला.
सात वाजेच्या सुमारास जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्राणावर श्रीमती जयश्री बोराडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थितांना योगाचे धडे दिले. तत्पूर्वी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एन. जी. गिमेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर.आर. अहिर यांच्यासह न्यायिक अधिकारी आर. एम. गव्हाणे वकील संघाचे अध्यक्ष, विधिज्ञ आणि न्यायालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com