Jalna Districtजालना जिल्हा

दरोडेखोरांच्या हल्ल्यात एक जण गंभीर

जालना-परतूर तालुक्यातील सालगाव येथे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या तिघांनी घरात घुसून घरातील एकाजणाला चाकुने भोसकल्याची घटना सोमवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास घडली . एकव्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्यांना जालना येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


सालगाव येथील वासुदेव नांनाभाऊ गाढवे आपल्या घरातील कंपाऊंडमध्ये झोपलेले असतांना रात्री 2 वाजेच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेले तिघेजण गेटवरुन उडीमारून आत आले. वासुदेव यांना मारहाण सुरू असतांना आरडाओरड ऐकून त्यांचा मुलगा कृष्णा बाहेर आला. बाहेर येताच तिघांपैकी एकाने कृष्णाच्या पोटात चाकू खुपसला. या ठिकाणची आरडा ओरड एकूण गावातील लोक जागे झाल्याने या तिघांनी या पोबारा केला. गावातील लोकांच्या मदतीने जखमी कृष्णा आणि वासुदेव यांना परतूर पोलीस ठाण्याला आणल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जालना येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरू असतांना जालना येथील खाजगी रुग्णालयात पोलीस उपनिरीक्षक नितीन गट्टवार यांनी वासुदेव गाढवे यांची फिर्याद नोंदवून घेतली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे करीत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे, पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जालना येथून श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते.

एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

Related Articles