Jalna Districtजालना जिल्हा

ग्रीन लॅड इंग्लिश स्कुल बोरखेडी येथे योगा दिन साजरा

जालना- तालुक्यातील बोरखेडी येथील ग्रीन लँड स्कुल शाळेत जागतिक योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सारिका कटके यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले . दैनंदिन जीवन जगत असताना आणि अभ्यास करताना योगासना मुळे होणारे फायदे त्यांनी विशद केले तसेच विद्यार्थ्यांनी नियमितपणे योगासने करावीत असे आवाहन  केले.

योगाशिक्षक भारत लालझरे यांनी विद्यार्थ्यांना योगासनांचे धडे दिले. योगासने करताना मनाची एकाग्रता आणि नियमितपणा याची आवश्यकता त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिली. बालवाडी व इयत्ता पहिली ते सातवी तील सर्व विद्यार्थी या योग अभ्यासाच्या वर्गात सहभागी झाले होते. यावेळीउपशिक्षक सदाशिव चिरखे ,रवी वाघचौरे,अमित काबळे,संतोष काबळे,सचिन बोटवे,अल्का वाघचौरे,पुष्पा राऊत,यांसह काही पालक उपस्थित होते. सदाशिव चिरखे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

Related Articles