Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

मंठा तालुक्यात पाझर तलाव फुटला: जीवितहानी नाही

mantha dam

मंठा- तालुक्यातील पांगरा गडदे येथे असलेला पाझर तलाव शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास फुटला. 1997 मध्ये हा पाझर तलाव तयार करण्यात आला होता, मात्र वेळोवेळी दुरूस्ती न केल्यामुळे अवघ्या पंचवीस वर्षातच हा तलाव फुटला आहे.

जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच या परिसरातील शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत होते. शेवटी मंगळवार बुधवार रोजी थोडा पाऊस आल्यामुळे शुक्रवारी सकाळीच या परिसरातील शेतकऱ्यांनी पेरण्या ही केल्या होत्या. परंतु हा तलाव फुटल्यामुळे पेरण्या तर वाया गेल्याच त्या सोबत जमीनही वाहून गेली आहे. सुदैवाने दिवस असताना हा तलाव फुटल्यामुळे जीवित हानी झालेली नाही .परंतु हजारो एकर शेती या तलावाच्या पाण्याखाली आल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान तहसीलदारांनी त्वरित पंचनामे करावेत,आणि झालेल्या नुकसानीची भरपाई देखील त्वरित करून द्यावी अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. अद्याप पर्यंत शेतीचे नुकसान झाले आहे हे मात्र अजून निश्चित झालेले नाही.

एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button