जालना-रस्त्यावर धावत असलेल्या बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका व्यवसायिक ठिकाणी घुसली.
सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र व्यवसायिकाचे सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे .सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जालना ते अमरावती बस अमरावती कडे जात होती. जालना शहर सोडल्यानंतर सुमारे पाच -सात किलोमीटर अंतरावर कन्हैयानगर च्या पुढे बस रस्त्यावरून धावत असताना ब्रेक फेल झाले, त्यामुळे चालकाचे बस वरील नियंत्रण सुटले आणि ही बस एका नदीच्या पुलाशेजारी असलेल्या व्यावसायिक ठिकाणी घुसली. सुदैवाने या अपघातामध्ये 16 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली आहे. ही बस कशी आली? कुठून आली? कशी घुसली? हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन , बीट अंमलदार अशोक जाधव बापू, तात्काळ हजर होऊन प्रवाशांना सुखरुप बाहेर काढून दुसऱ्या बस मध्ये बसून दिले.
एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com