ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेची रॅली
जालना-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जालन्यात आज जिल्हा शिवसेनेच्या वतीने रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले . आणि उद्धव ठाकरे यांना समर्थन दिले.
वाजेच्या सुमारास मामा चौकातून ही रॅली निघाली सराफा कादराबाद मार्गे गांधीचमन येथे येऊन मान्यवरांच्या भाषणानंतर रॅलीचे विसर्जन झाले.रॅलीमध्ये माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर ,महिला आघाडीच्या नेत्या डॉ. मनीषा कायंदे यांच्यासह माजी मंत्री अर्जुनराव खोतकर ,जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, ए. जे. बोराडे शिवसेनेचे उपनेते हिकमत उढाण यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी नेत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
दरम्यान मोर्चासाठी तगडा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होत भुता बिल्डिंग चौकामध्ये पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे हे स्वतः या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते.
**एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com