297 किलो गांजा जाळून केला नष्ट
जालना-विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला गांजा पोलिसांनी आज विशेष समितीच्या उपस्थितीमध्ये जाळून नष्ट केला आहे.
जालना जिल्ह्यात नऊ पोलीस ठाण्या अंतर्गत 15 गुन्ह्यांमध्ये 297 कीलो 916 ग्राम गांजा जप्त केला होता. जप्त केलेला हा गांजा एका विशिष्ट ठिकाणी साठविला होता. दरम्यान अमली पदार्थ नष्ट करण्यासाठी न्यायालयाची परवानगी लागते, त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी न्यायालयाची परवानगी घेऊन आज हा गांजा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात जाळून नष्ट केला आहे.
हा गांजा नष्ट करण्यासाठी आवश्यक असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक संजय व्यास, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्यासह सहायक रासायनिक विश्लेषक संतोष कोते, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या डॉ. योगिनी बालनके, वजन मापे कार्यालयाचे रमेश राठोड, नगरपालिका अग्निशमन दलाचे अधिकारी उपस्थित होते.
एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com