आषाढी एकादशी यात्रे निमित्त जालना, औरंगाबाद आणि नांदेड येथून पंढरपूर करिता विशेष गाड्या
जालना-आषाढी एकादशी यात्रे च्या निमित्ताने मराठवाड्यातील तीन प्रमुख स्थानकांवरून पंढरपूरपर्यंत विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.
या उत्सवा दरम्यान श्री विठ्ठला च्या दर्शना करिता मराठवाड्यातून मोठ्या संख्येने यात्रेकरू प्रवास करतात. त्यांच्या प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रेल्वेने जालना, नांदेड आणि औरंगाबादहून पंढरपूर आणि परतीसाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्वे सेवा 9 जुलै, 2022 पासून सुरू होणार आहेत.
➢ जालना – पंढरपूर – जालना विशेष रेल्वे सेवा: गाडी क्रमांक 07468 आषाढ एकादशी विशेष जालना स्थानकावरून 9 जुलै 2022 रोजी सायंकाळी 19.20 वाजता निघेल आणि पंढरपूरला दुसऱ्या दिवशी सकाळी 06.30 वाजता पोहोचेल. परतीच्या दिशेने गाडी क्रमांक 07469 विशेष गाडी 10 जुलै, 2022 रोजी रात्री 20.30 वाजता पंढरपूर स्थानकावरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10.00 वाजता जालन्याला पोहोचेल.
या गाडीत वातानुकुलीत, द्वितीय शय्या (स्लीपर), जनरल असे 13 डब्बे असतील.
➢ औरंगाबाद – पंढरपूर – औरंगाबाद विशेष ट्रेन सेवा: गाडी क्रमांक 07515 विशेष ट्रेन 9 जुलै 2022 रोजी औरंगाबाद स्टेशनवरून रात्री 21.40 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी 11.30 वाजता पंढरपूरला पोहोचेल. परतीच्या दिशेने गाडी क्र. 07516 स्पेशल पंढरपूर स्टेशनवरून 10 जुलै 2022 रोजी रात्री 23.00 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी 12.20 वाजता औरंगाबादला पोहोचेल.
या गाडीत द्वितीय शय्या (स्लीपर), जनरल असे 17 डब्बे असतील.
➢ नांदेड – पंढरपूर – नांदेड विशेष रेल्वे सेवा: गाडी क्रमांक 07498 विशेष गाडी नांदेड स्थानकावरून 9 जुलै 2022 रोजी दुपारी 15.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10.35 वाजता पंढरपूरला पोहोचेल. परतीच्या दिशेने गाडी क्रमांक 07499 स्पेशल पंढरपूर स्टेशनवरून 10 जुलै 2022 रोजी रात्री 21.30 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 18.50 वाजता नांदेडला पोहोचेल.
या गाडीत वातानुकुलीत, द्वितीय शय्या (स्लीपर), जनरल असे 18 डब्बे असतील.
पंढरपूर मंदिरात आषाढी एकादशी सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या मराठवाड्यातील लोकांसाठी विशेष रेल्वे गाडी रात्रीचा प्रवास सोयीस्कर करेल. या विशेष गाड्यांना विभागातील सर्व वारकऱ्यांच्या / भक्तांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तिन्ही ठिकाणांहून वेगवेगळ्या रेल्वे सेवा देण्यात आल्या आहेत. पंढरपूर येथे दिवसा उत्सवाला हजेरी लावण्यासाठी आणि रात्रीच्या वेळी परतीच्या दिशेने परत येण्यासाठी या रेल्वे गाड्या वारकऱ्यांच्या / भक्तांच्या गरजा योग्य प्रकारे पूर्ण करतील असे श्री उपिंदर सिंघ, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी कळवले आहे.
***एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com