Jalna Districtजालना जिल्हा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रेल्वेचा सुरक्षा बलाचा आनंदोत्सव

जालना- स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने रेल्वे सुरक्षा बलाची मोटार सायकल रॅली काढून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त नांदेड विभागाच्या वतीने ही रॅली काढण्यात आली आहे.एक जुलै रोजी नांदेड येथून सुरुवात झालेली ही रॅली परभणी, सेलू ,परतूर ,करून आज जालना येथे आली. उद्या सोमवार दिनांक औरंगाबाद येथे ही रॅली जाऊन येथे विसर्जित होणार आहे.

रॅली दरम्यान ठीक ठिकाणी रेल्वेच्या जवानांनी जनतेशी संपर्क साधला आणि भारतीय स्वातंत्र्याचा आनंदोत्सव साजरा केला. आणि रेल्वे पोलीसबला विषयी माहिती दिली या रॅलीमध्ये दोन चार, चाकी वाहन, पाच बुलेट, याच्यासह तीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सहा हेड कॉन्स्टेबल आणि सात कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे. आज ही रॅली ज्यावेळी जालन्यात आली त्यावेळी रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक नारायणा राम यांनी त्यांचे स्वागत केले ,यावेळी त्यांच्यासोबत स्थानक व्यवस्थापक विनोद भारती, वाहतूक निरीक्षक रवींद्रकुमार, लोहमार्ग पोलीस चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक पी. एस. चव्हाण ,रेल्वेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप कुमार आदींची उपस्थिती होती.

एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

Related Articles