तुपेवाडी ची शाळा भरली जिल्हा जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये
जालना- बदनापूर तालुक्यातील मौजे वसंतनगर तुपेवाडी येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी आज जिल्हा परिषद गाठून मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची भेट झाली नाही.दरम्यान शिक्षणाधिकारी कैलास दातखखीळ यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागणीकडे लक्ष दिले आहे.
बदनापूर तालुक्यातील मौजे वसंत नगर येथे पत्राच्या शेडमध्ये तीन खोल्या आहेत आणि त्या देखील मोडकळीस आलेल्या आहेत. 40 वर्षांपूर्वीची ही शाळा आहे मात्र देखभाल दुरुस्ती अभावी दयनीय अवस्था झाली आहे, आणि विद्यार्थ्यांच्या जीववितालाही धोका आहे. त्यामुळे 22 जून 2017 च्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ही शाळा पाडण्याचा ठरावही मंजूर झाला होता. मात्र ती अद्याप पर्यंत पाडण्यात आली नाही. अशा परिस्थितीतच विद्यार्थी इथे ज्ञान संपादन करत आहेत. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका आहे.
यासंदर्भात गावकऱ्यांनी वारंवार जिल्हा परिषदेला शाळेची मागणी केली मात्र ती पूर्ण झालीच नाही. त्यामुळे आज माजी सरपंच रतनकुमार नाईक यांच्या नेतृत्वाखाली काही गावकरी आणि शालेय विद्यार्थ्यांनी जालना जिल्हा परिषद गाठली आणि मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात शाळा भरवण्याचा प्रयत्न केला, मात्र अधिकारी दौऱ्यावर गेल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. परंतु शिक्षणाधिकारी कैलास दातखिळी यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.
एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com