खाजगी सावकाराच्या घराची झडती; 33 दस्तावेज जप्त
जालना- तालुक्यातील सिंधी काळेगाव येथील खाजगी सावकाराच्या घराची झडती घेतली असता 33 संशयास्पद दस्तावेज जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत.
जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव येथे राहणाऱ्या अर्जुन भीमराव गिराम यांनी सिंधी काळेगाव शिवारातील गट नंबर 141 मधील 02 आर शेतजमीन गहाण ठेवून 15 लाख रुपये व्याजाने घेतले होते. परंतु जमीन काही परत मिळत नव्हती त्यामुळे अर्जुन गिराम यांनी जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्याकडे तक्रार दिली होती.
त्या अनुषंगाने श्री. चव्हाण यांनी तालुका उपनिबंधकांना आदेश देऊन खाजगी सावकार प्रकाश रामराव गोरे, राहणार छत्रपती पेट्रोल पंपाजवळ सिंधी काळेगाव यांच्या घराची झडती घेतली. पथक प्रमुख सहाय्यक उपनिबंधक पी. बी. वरखडे यांनी 11 कर्मचाऱ्यांसह झडती घेतली आणि या झडतीमध्ये प्रकाश गोरे यांच्या घरातून 33 संशयास्पद दस्तावेज जप्त केले आहेत. त्यामध्ये खरेदीखत, करारनामा, हिशेबोह्या, कच्च्या, नोंदी आदी दस्तावेजाचा समावेश आहे.
एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com