Jalna Districtजालना जिल्हा

चोराचा नवीन फंडा; अर्धनग्न, डोक्यावर हेल्मेट, आणि कुलरच्या डक मधून प्रवेश

जालना- दिवसेंदिवस चोर नवनवीन फंडे आजमावत आहेत मात्र सीसीटीव्ही कॅमेरा मुळे त्यांचा बचाव अवघड झाला आहे. असाच एक चोरटा नवीन जालन्यातील परिवार शॉपी मध्ये चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या गोपीकिशन नगर मध्ये परिवार सुपर शॉपी हा मॉल आहे यामध्ये गुरुवार दिनांक सात रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास एक चोरटा कुलरचे डक फोडून आतमध्ये उतरला तो अर्ध नग्न होता, आणि आपली ओळख पटू नये म्हणून डोक्यावर हेल्मेट देखील घातले होते. दुकानातील दोन्ही काउंटर मधील रोख एक लाख 25 हजार लंपास केले. त्याचसोबत इंटरनेटचे दोन राऊटर आणि पॅरागॉन चे 10 नग शूज सोबत घेऊन गेला आहे.


सुमारे एक लाख 40 हजाराचा मुद्देमाल या चोरट्याने लांबविला आहे. हा चोरटा पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेरात कैदही झाला आहे. दुकानाचे संचालक मोहम्मद फिरोज मोहम्मद मकबूल वय 42, यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सीसीटीव्हीतील या चोरट्याचा पोलीस कसून तपास करत आहेत.

एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

Related Articles