सद्गुरूंच्या चरणी ग्रीनलँड इंग्लिश स्कूलची वारी
जालना-जालना तालुक्यांतील बोरखेडी येथील ग्रीन लॅन्ड स्कुल च्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी काढली होती.
जय जय राम कृष्ण हरी! ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम, मुक्ताबाई, जनाबाई, एकनाथ असा अखंड जयघोष आणि टाळ मृदंगाचा गजर करत विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्रितपणे दिंडी काढली. यावेळी हातात भगवे झेंडे, घोडा स्वारी, करत विद्यार्थ्यांनी नको पांडुरंगा मला सोन्याचे चांदीचे दान रे! फक्त भिजव पांडुरंग हे तहानलेले रान रे!! कमरेवरचा हात सोडून आभाळाला लाव तू! ढगाला थोडे हलवून भिजव माझे गाव तू! असे विविध अभंग बोलत पालखी सोहळा साजरा करण्यात आला. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी, मुक्ताई, तुकाराम, एकनाथ, जनाबाई डोक्यावर तुळशी वृंदावन, गळ्यात माळा, विविध संतांची वेशभूषा करून सद्गुगुरु सदानंद महाराज रंगनाथ महाराज विश्रांती मठावर दिंडी काढण्यात आली. दिडी सोहळ्यात रिंगण, फुगडी, पारंपारीक लेझीम, आदी आकर्षणातून मन प्रसन्न झाले.
यावेळी उपस्थित शाळेच्या अध्यक्षा सारीका कटके, मुख्याध्यापक अतिष देशमुख, सहशिक्षक भरत लालझरे अमित कांबळे, सचिन बुटवे सदाशिव चिरखे, संतोष कांबळे, पुष्पा राऊत, अरती बोरुडे, वाहक सुनिल खरात ,राहुल उबाळे ,कृष्णा कवडे, शिपाई गणेश पवार पालक व भक्तगण मोठ्या संख्येत उपस्थित होते.
एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com