Jalna Districtजालना जिल्हा

“अवघा रंग एक झाला” निरामय हॉस्पिटल मध्ये

जालना -आषाढी एकादशी निमित्त निरामय हॉस्पिटलमध्ये गायक दिनेश संन्याशी डॉक्टर मोहिनी रायबाग कर आणि कु अंजली काजळकर यांनी गायलेल्या भक्ती गीतांचा एक रंग झाला होता निमित्त होते आषाढी एकादशी निमित्त गायन सेवेचे.
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपाचे नेते भास्कर दानवे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी यांची महाआरती करून निरामय हॉस्पिटलच्या माहिती पुस्तकाचेही प्रकाशन करण्यातआले.

सायंकाळच्या गायन सेवेला विशेष उपस्थिती माजी नगराध्यक्षा संगीता गोरंटयाल, सपना गोयल, डॉ .प्रसाद चौधरी, सुलभा कुलकर्णी,प्रकाश कुंडलकर, सचिन देशमुख यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुमित शर्मा, साथ संगत : तबला संदीप गुंजकर , श्रीनाथ देशपांडे आणि राधेय खिस्ते हार्मोनियम पार्थ दायमा आणि अर्णव गोसावी टाळ संगत राधिका दहीभाते यांनी दिली.तर प्रशांत जाधव यांनी निवेदन केले.निरामय हॉस्पिटलचे संचालक डॉ. पद्माकर सबनीस ,डॉ. गोविंद पाटील डॉ. धनश्री सबनीस, डॉ. नीतू पाटील डॉ. नितीन गादेवाड, उद्धवराव देशमुख यांच्यासह हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला होता.

एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

Related Articles