फेसबुकच्या मित्राने लावला दहा लाखांना चुना
परतूर-एका पंधरा वर्षाच्या मुलाशी मैत्री करून शेतात सोन्याचा हंडा सापडला आहे. तुलाच कमी पैशात कमी पैशात देतो अशी लालूच त्याला दाखवली. या मुलाने ही सर्व हकीकत त्याच्या घराशेजारी राहणार्या व्यक्तिला सांगितल्या नंतर कमी पैशात सोने मिळत असल्याची लालचीत पडलेल्या दोघा मित्रांना दहा लाखात एक किलो बनावट सोने देऊन विश्वासात घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात दि. ११ जुलै रोजी तिघा जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरख रावसाहेब लांब रा. तांबवा ता. केज.जि.बीड यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,गावातील शेजारी राहणारा पंधरा वर्षीय मुलगा महादेव कोल्हे यांची एका अनोळखी व्यक्तीसोबत फेसबुकवरुन मैत्री झाली. त्याने फोनकरुन शेतामध्ये खोदकाम करताना सोन्याचा एक हंडा सापडला असुन तो विकायचा आहे. तुला खुप कमी किंमतीत देईल, तु एकदा परतुरला येवून सोने पाहुन एक सम्पल दाखविण्यासाठी घेऊन जा म्हणजे तुझा विश्वास बसेल,आणि ते सेम्पल सोने खरे निघाल्याने विश्वास बसला.
दहा लाखाची जमवाजमव करून फोनवरून पैसे घेवुन सोने विकत घेण्यासाठी येत असल्याचे कळविले. दि ७ मे रोजी २०२२ रोजी कारने वाटुर फाटा मंठा रोडला बोलवले. व त्यांच्याजवळ असलेले सोने देऊन दहा लाख रुपये घेवुन तेथुन निघुन गेले. पैसे देऊन घेतलेले सोने सोनाराकडे जावुन दाखविले असता सोनाराने सर्व सोने खोटे असल्याचे सांगितले.
फसवणूक झाल्याची लक्षात येताच त्या तिघांना शोधण्याचा प्रयत्न केला असता काही पत्ता लागला नाही. या प्रकरणी गोरख लांब यांनी दिलेल्या तक्रारीनुसार परतूर पोलीस ठाण्यात शामराव पवार त्यांची पत्नी व मुलगा रा. खुरानपुर ता.लोणार यांनी विश्वासात घेवून फसवणुक करुन दहा लाख रुपये घेवुन फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पुंडगे हे करीत आहेत.
*एम.डी. पोहनेरकर*
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com