पहिल्या गुरूंनी शिकविलेल्या गोष्टी आजही उपयोगाच्या- सीईओ जिंदल
जालना- माझे पहिले गुरू म्हणजे वडील ,ज्यांनी माझ्यातील कमजोर पणा दूर करून त्याला सकारात्मक वळण दिले आणि मला घडविले.
हा कमजोरपणा दूर करताना त्यांनी ज्या छोट्या छोट्या गोष्टी मला शिकविल्या त्या मला आजही फायद्याच्या ठरत असून दैनंदिन जीवनात उपयोगाला येतात .निकाल काय आला यापेक्षा तो सोडविण्याचा प्रयत्न केला यावर वडिलांनी भर दिला. आणि म्हणूनच मी आज इथपर्यंत आलो आहे असे मत जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल यांनी आज गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुढे बोलताना श्री. जिंदल म्हणाले की, खरे तर माझे आध्यात्मिक गुरु नाहीत, परंतु खोलवर अभ्यास करण्यासाठी अध्यात्मक कामाला येते हे नक्की. अध्यात्मासाठी थोडा वेळ दिला पाहिजे जेणेकरून काही प्रश्न सोडवण्यासाठी त्याची मदत होईल. आयुष्याला वळण देण्यासाठी ठीक- ठिकाणी गुरु भेटतात आणि त्यामधील दोन महत्त्वाचे गुरु म्हणजे सैनिकी शाळेत शिकत असताना भेटलेले लेफ्टनंट कर्नल पांघळ सर, त्यांनी माझ्यामध्ये आत्मविश्वास भरला आणि दुसरे खेळाचे शिक्षक ब्रिजेश कुमार मिश्रा जे क्रिकेट टीमचे कॅप्टन होते. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून जी जबाबदारी टाकली होती ती पूर्ण करून घेतली. या दोन्ही गुरूमुळे माझ्यामुळे आत्मविश्वास निर्माण झाला आणि मी पुढे चालत राहिलो. सध्या डिजिटल युगामध्ये काही डिजिटल टीचर्स देखील माझे गुरु आहेत आणि मी त्यांना फॉलो करतो. असेही श्री. जिंदल यांनी सांगितले.
*एम.डी. पोहनेरकर*
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com