आपल्यामध्ये संस्कार रुजविणारे सर्वच गुरु- जिल्हाधिकारी डॉ. राठोड

जालना- जन्माला आल्यानंतर जगायचं कसं !हे शिकविणारे सर्वात पहिले गुरू म्हणजे आई वडील. त्यानंतर थोडं मोठं झाल्यानंतर जगामध्ये जगण्यासाठी जे ज्ञान आवश्यक असतं ज्या ज्ञानामुळे माणूस सुशिक्षित आणि सुज्ञ नागरिक बनतो ते ज्ञान देणारे शालेय जीवनातील शिक्षक हे दुसरे गुरु आणि त्यापुढे गेल्यानंतर स्वतःच्या पायावर उभे राहत असताना वेगवेगळ्या वाटेवर वेगवेगळे व्यक्ती भेटतात ,त्यामध्ये नातेवाईक मित्रपरिवार, आप्तेष्ट, हितचिंतक, अशा प्रकारच्या अनेक व्यक्ती भेटतात जे आपल्या मध्ये काही चांगले मूल्य रुजविता ,ते देखील गुरूच आहेत .
गुरु हे आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतात आणि आपले आयुष्य तेजोमय करतात. त्यामुळे अशा सर्व गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे . जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुंबद्दल चे विचार व्यक्त करताना सांगितले.
*एम.डी. पोहनेरकर*
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com