Jalna Districtजालना जिल्हा

मुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्णयाचं काँग्रेसचे आमदार गोरंट्याल यांच्याकडून स्वागत

जालना -नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लक्षात घेता जिल्हा काँग्रेस समितीची आज बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील आजी- माजी सर्व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लक्षात घेता कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे असे आवाहन यावेळी सर्वच नेत्यांनी केले. बैठकीला काँग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख ,माजी आमदार तथा माजी जिल्हाध्यक्ष सुरेश जेथलिया, जालन्याचे शहराध्यक्ष शेख मेहमूद यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.

दरम्यान यावेळी बोलताना आ. कैलास गोरंट्याल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीच्या निर्णयाचे स्वागत केलेआणि आपण त्याला पाठिंबा देत असल्याचेही ते म्हणाले. कारण मागील वेळी मोदी सरकारची लाट असतानाही जालना जिल्ह्यातील जालना, भोकरदन, परतुर, येथे काँग्रेसचे नगराध्यक्ष झाले होते. त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये काँग्रेसला पोषक वातावरण आहे, आणि जनता ही काँग्रेसवर विश्वास ठेवून आहे. त्यामुळे यावेळी देखील या तीन नगरपालिकांपेक्षाही जास्त नगरपालिका ताब्यात घेऊ असा विश्वास आमदार कैलास गोरंट्याल यांनी यावेळी व्यक्त केला.

*एम.डी. पोहनेरकर*
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

Related Articles