Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

शौचाला बसण्यास विरोध केल्यामुळे मायलेकराचा खून

जालना -तालुक्यातील एरंडवडगाव शिवारात असलेल्या अचानक तांडा येथे देवीलाल सिल्लोडे यांची गावाजवळच शेती आहे. या शेतात गावातील शिंदे कुटुंबातील काही मुले सराईत गुन्हेगार आहेत, ते रात्री गुन्हा करून आल्यानंतर लपून बसत. तसेच, याच शेतात नियमितपणे हे संडासला बसत असत.
या सर्व गोष्टींना सिल्लोडे कुटुंबातील सदस्यांचा विरोध होता.

शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास शेतात शौचाला बसण्यास विरोध केल्याच्या कारणावरून सिल्लोडे यांच्या कुटुंबाला दहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करीत चाकूने भोसकले.यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सिल्लोडे कुटुंबाला तातडीने जालना येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते.


मात्र, तत्पूर्वीच, सुमनबाई देवीलाल सिल्लोडे (वय ५५), आणि मंगेश देवीलाल सिल्लोडे (वय २५) या मायलेकाचा रस्त्यातच मृत्यू झाला . देवीलाल सिल्लोडे आणि योगेश सिल्लोडे यांची प्रकृती गंभीर असून, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सेवली पोलिसांनी विजय शिंदे, सुधाकर शिंदे, शितल शिंदे, तुकाराम शिंदे, मुंगळया भोसले, छकुली शिंदे, रंजना पवार, सुरेखा शिंदे, चिंटू शिंदे आणि एक जाड व्यक्ती अशा दहा जणाविरुद्ध आज पहाटे गुन्हा दाखल केला आहे.घटनेची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, परतुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे, मौजपुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मोरे पाटील, सेवलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. एन. उबाळे, परतुरचे पोलीस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे आदींनी रात्रीच तातडीने घटनास्थळी भेट दिली.

******एम.डी. पोहनेरकर*
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button