पुण्यातून चोरलेल्या मोटरसायकल जालन्यात
जालना-पुणे येथून चोरलेल्या आठ महागड्या मोटरसायकल आणि जालना शहरातील एक मोटरसायकल अशा एकूण नऊ मोटरसायकल चोरल्याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात मोटरसायकल विकण्यासाठी एक व्यक्ती ग्राहक शोधत असल्याचे समजले त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून नूतन वसाहत भागामध्ये जाफराबाद तालुक्यातील शिराळा येथे राहणाऱ्या संदेश प्रभाकर पाटोळे याला अडवून त्याच्याकडे असलेल्या केटीएम मोटरसायकल विषयी माहिती विचारली त्यावेळी त्याने सदरील मोटरसायकल ही जालना शहरात टीव्ही सेंटर भागात असलेल्या म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या सुरज राजू कसबे वय 21 याच्यासोबत पुणे येथून चोरी करून आणले असल्याचे सांगितले तसेच या मोटरसायकल सोबत पुणे येथूनच अन्य सात मोटरसायकल आणि जालन्यातून एक मोटरसायकल अशा एकूण नऊ मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली तसेच पुणे येथे नागरिकांकडून मोबाईल हिसकून आणल्याचेही त्यांनी सांगितले आणि सदरील मुद्देमाल स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांकडे जमा केला आहे पोलिसांनी एकूण नऊ मोटरसायकल आणि विविध कंपनीचे मोबाईल असा एकूण आठ लाख पंचावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे दरम्यान शिराळा येथील संदेश प्रभाकर पाटोळे हा सध्या जालन्यातील नूतन वसाहत भागात वास्तव्याला आहे पोलिसांनी सुरज कसबे आणि संदेश पाटोळे या दोघांनाही ताब्यात घेतले आहे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या पथकाने ही कारवाई केली या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले नामदेव गायके कृष्णा तंगे कैलास चेके आदींचा समावेश होता.
*एम.डी. पोहनेरकर*
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com