Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष करणार साडेपाचशे किमी चा सायकल प्रवास

जालना- आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने मराठवाडा वित्तीय समावेशन व साक्षरता अभियान सुरू करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून दिनांक 20 जुलै पासून औरंगाबाद येथून 15 कर्मचाऱ्यांची साक्षरता रॅली काढण्यात आली आहे.

दिनांक 31 जुलैला उमरगा येथे या रॅलीचा समारोप होणार आहे .बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड हे स्वतः या रॅली सोबत सायकल चालवत असून साडेपाचशे किलोमीटरचा प्रवास ते करणार आहेत.” आजादी का अमृत महोत्सव” आणि बँकेच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त ही सायकल रॅली आयोजित केली आहे. रॅली दरम्यान मुख्य ठिकाणी गावांमध्ये जाऊन ग्रामीण भागातील ग्राहकांना आर्थिक सुबत्ता आणि डिजिटल विषयी साक्षर केल्याजात आहे. याचाच एक भाग म्हणून आज सकाळी जालन्यात ही रॅली आली. यावेळी झालेल्या मेळाव्यात महिला बचत गटातील महिलांना आर्थिक आर्थिक मदतही करण्यात आली. शेतकरी देखील उपस्थित होते.

दरम्यान बँकेच्या विविध योजना शेतकऱ्यांना या माध्यमातून सांगितल्या जाणार आहेत .या रॅलीमध्ये पाच विभागातील 15 कर्मचारी सहभागी आहेत आजच्या या कार्यक्रमाला बँकेचे अध्यक्ष मिलिंद घाराड यांच्यासह, सरव्यवस्थापक विजय मानकर, नाबार्डचे अधिकारी तेजल क्षीरसागर, लिड बँकेचे व्यवस्थापक प्रेषित मोघे, क्षेत्रीय व्यवस्थापक वसंत बुरकुल, नियोजन विभागाचे मुख्य व्यवस्थापक संतोष प्रभावती, जालना शाखा व्यवस्थापक एकनाथ कोडग, यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

****एम.डी. पोहनेरकर*
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button