Jalna Districtजालना जिल्हा

हिंस्र प्राण्यांचा उपद्रव; वन विभागाने दिली 15 लाखांची नुकसान भरपाई

जालना- जंगली किंवा हिंस्र प्राण्याने केलेल्या उपद्रवामुळे विविध प्रकारात वनविभागाने सन 21- 22 आणि 22 -23 मध्ये 15 लाख रुपये नुकसान भरपाई संबंधितांना दिली आहे.

जंगली प्राण्यांमुळे अनेक वेळा पिकांचे ,पशुधनाचे, आणि वेळप्रसंगी माणसांचीही जीवित हानी होते .अशा या अडचणीच्या प्रसंगी वनविभागाकडून संबंधिताला नुकसान भरपाई देखील दिल्या जाते. एकीकडे वनविभागाच्या नावाने खडे फोडत असतानाच दुसरीकडे अशा प्रकारची नुकसान भरपाई मिळते हे क्वचितच जनतेला माहित आहे. सन 2021 ते20 23 दरम्यान वनविभागाने पीक नुकसान पशुधन आणि मनुष्यहानी या तीन प्रकारांमध्ये सुमारे 14 लाख 80 हजार 472 रुपये नुकसान भरपाई म्हणून संबंधितांना आदा केले आहेत .नुकसान भरपाई मागण्यासाठी विहित नमुन्यात ऑनलाइन वर माहिती भरावी लागते आणि त्यानंतर घटनास्थळाची पाहणी करून नुकसान भरपाई दिल्या जाते.

     *अशी मिळते नुकसान भरपाई*पीक नुकसान *सन 21 -22 मध्ये 202 शेतकऱ्यांना तर 22- 23 मध्ये 18 शेतकऱ्यांना पिकाची नुकसान झाल्याबद्दल भरपाई मिळाली आहे. या भरपाई मध्ये हरीण, रानडुक्कर ,अशा प्रकारच्या जंगली प्राण्यांनी पिकाचे नुकसान केल्यानंतर 72 तासाच्या आत ऑनलाईन अर्ज करावा लागतो. एका कुटुंबाला हेक्टरी अडीच हजार रुपये नुकसान भरपाई मिळते. त्यानुसार आत्तापर्यंत नऊ लाख 91 हजार 848 रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे.**दुसऱ्या प्रकारात पाळीव प्राण्यांनी केलेली नुकसान भरपाई मिळते. यामध्ये गोठ्यामध्ये बैल, म्हैस, गाय, शेळी, अशा पाळीव प्राण्यावर जर जंगली प्राण्यांनी हल्ला केला आणि त्यामध्ये नुकसान झाले तर ही नुकसान भरपाई मिळते. त्यानुसार 2021 -22 मध्ये 18 आणि 22 -23 मध्ये नऊ अशा एकूण 27 लाभार्थ्यांना या नुकसान भरपाई चा फायदा झाला आहे ,आणि तीन लाख 29 हजार 750 रुपये पशुधन मालकांना नुकसान भरपाई मिळाली आहे.

**तिसऱ्या प्रकारात मनुष्यहानी बद्दल सण 21- 22 मध्ये चौघांना इजा पोहोचली होती. त्यामध्ये एक लाख 58 हजार 874 रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. यामध्ये रानडुक्कर, बिबट ,वाघ, तडस ,यांनी माणसांवर हल्ला केल्यानंतर झालेली नुकसान भरपाई दिल्या जाते. त्यासोबत किरकोळ वैद्यकीय खर्च देखील संबंधितांना मिळतो . अंबड तालुक्यातील एका शेतकरी महिलेवर बिबट्याने हल्ला करून तिचा जीव घेतला होता त्यांचाही समावेश आहे , नीलगाय आणि वानर यांनी केलेल्या हल्ल्याचा यामध्ये समावेश नाही. अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वनविभागाने ही नुकसान भरपाई दिलेली आहे, आणि ज्या शेतकऱ्यांचे पशुधन आणि पीक नुकसान झाले असेल अशा शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत ऑनलाईन अर्ज करावा असे आवाहन वनाधिकारी पुष्पा पवार यांनी केले आहे.

*एम.डी. पोहनेरकर*
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button