Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

गजानन महाराजांची पालखी रविवारी जालन्यात; वाहतुकीत बदल

जालना- संतश्रेष्ठ श्री. गजानन महाराज यांची पालखी परतीच्या प्रवासात पंढरपूरहुन निघाली आहे, आणि आज शुक्रवार दिनांक 22 रोजी शहागड च्या पुलावरून जालना जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केला आहे.

आज शहापूर आणि उद्या लालवाडी येथे मुक्काम केल्यानंतर रविवारी 24 तारखेला ती जालना तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करणार आहे .दरम्यान जालना शहरात 24 आणि 25 असे दोन दिवस या पालखीचा मुक्काम असणार आहे त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी जालना शहरातील वाहतुकीत बदल करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

* शहरातील वाहतुकीचे बदल*
1 बस स्थानकाकडून सुभाष चौक मार्गे जुना जालना जाणारी वाहतूक लक्कडकोट, बाजीराव पेशवे चौक मार्गे वळविण्यात आले आहे.
2) बस स्थानकाकडून पाणीवेस काद्राबाद चौकी मार्गे मंगळ बाजार छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणारी वाहतूक जुना मोंढा जवळील दीपक वाईन्स पासून सदर बाजार रोड, बडी सडक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाईल .3) बस स्थानकाकडून मामा चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणारी वाहतूक दीपक वाईन्स जवळून जुना मोंढा, सदर बाजार रोड, बडी सडक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाईल. 4) छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून टांगा स्टँड मार्गे मामा चौकाकडे येणारी वाहतूक बडी सडक सदर बाजार रोड जुना मोंढा मार्गे बस स्टँड कडे जाईल. 5) छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सराफा लाईन सुभाष चौक मार्गे जुना जालना कडे जाणारी वाहतूक रामनगर बायपास रोड मार्गे जाईल.6)मंगळ बाजार कादराबाद चौकी परिसरातील सुभाष चौकातून जुना जालना कडे जाणारी वाहतूक ही मंगळ बाजार चमडाबाजार राजमहल टॉकीज पुलावरून जुन्या जालन्यात येईल. 7) रेल्वे स्टेशन गांधी चमन कडून मंमादेवी सुभाष चौक मार्गे नवीन जालन्यामध्ये जाणारी वाहतूक ही मंमादेवी चौकातून वीज मंडळ कार्यालय, राजमहल टॉकीज, चामडा बाजार मार्गे जाईल, वरील मार्गाच्या अवजड वाहतुकीमध्ये दिनांक 25 च्या सकाळी सहा वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे.

 

*एम.डी. पोहनेरकर* 8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button