Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

जमावाला काबूत आणण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याचा हवेत गोळीबार

जालना- दोन गटात चाललेली तुंबळ हाणामारी सोडण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने हवेत गोळीबार केला आणि जमावाला काबूत आणले. या अधिकाऱ्याने समय सूचकता पाहून घेतलेल्या निर्णयामुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे.

आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास नागेवाडी शिवारातील बुद्धविहारासमोर असलेल्या बंद पेट्रोल पंपावर दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी सुरू झाली होती. पेट्रोल पंप बंद असल्यामुळे मोकळी जागा आहे या जागेत वाघुंडे आणि वाळके हे दोन गट समोरासमोर भिडले. त्यांच्यामध्ये काठ्या कुऱ्हाड, लोखंडी सळ्या या साहित्याचा हाणामारीसाठी वापर केला गेला. दरम्यान ही हाणामारी सुरू असतानाच जालना येथून बदनापूर कडे जात असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक साईनाथ रामोड यांनी ही घटना पाहिली आणि समसूचकता लक्षात घेऊन लगेच त्यांनी हस्तक्षेप करण्याचाही प्रयत्न केला. खरे तर त्यांच्या हद्दीतील ही घटना नव्हती मात्र रामोड यांच्यामधील पोलीस जागा झाला आणि त्यांनी हे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही गट ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी साईनाथ रामोड यांनी त्यांच्या सरकारी पिस्तुलांमधून हवेत गोळीबार केला. श्री. रामोड पोहोचण्यापूर्वी झालेल्या हाणामारी मध्ये अनेक जण जखमी झाले होते. या जखमींना पोलिसांनी तातडीने सामान्य रुग्णालयात भरती केले आहे .घटनेची माहिती मिळताच चंदनजिरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सावळे हे देखील रामोड यांच्या मदतीला धावून आले आहेत.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे.

*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button