कारागृहात कैद्याचा मृत्यू; कुठे होते शवविच्छेदन ?
जालना -पहिल्या पत्नीचा व मुलीचा खून केल्याच्या रोपावरून शिक्षा भोगत असलेल्या गणेश गोविंद सातारे, वय37 रा. सोनल नगर जालना सध्या मध्यवर्ती कारागृह येथे दिनांक 28 मे 2022 पासून शिक्षा भोगत आहे. दरम्यान आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास या गणेश सतारे याचा मृत्यू झाला आणि कारागृहातील कर्मचाऱ्यांनी सामान्य रुग्णालय जालना येथे तपासणीसाठी आणले. दरम्यान डॉ. जायभाये यांनी कैद्याची तपासणी करून मृत घोषित केले.
*उत्तरीय तपासणीची विशिष्ट पद्धत* कारागृहामध्ये एखाद्या कैद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या उत्तरीय तपासणीची विशिष्ट पद्धत शासनाने घालून दिली आहे .त्यानुसार कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी सामान्य रुग्णालयाला कळविल्यानंतर तेथील डॉक्टर कारागृहात जाऊन कैद्याला तपासतात आणि त्यानंतर कारागृहातील अधिकारी या कायद्याला सामान्य रुग्णालयात घेऊन येतात त्याची परत इथे तपासणी होते, आणि डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर ही माहिती जिल्हाधिकारी, तहसीलदार, आणि संबंधित पोलीस ठाण्याला दिली जाते. त्यानंतर या कैद्याच्या उत्तरीय तपासणीसाठी हा मृतदेह ज्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय किंवा फॉरेन्सिक लॅब आहे अशा ठिकाणी इन कॅमेरा ही तपासणी केल्या जाते. या तपासणीच्या वेळी संबंधित पोलीस ठाण्याचा एक पोलीस उपनिरीक्षक, तहसीलचा एक अधिकारी कारागृहाचे अधिकारी यांची उपस्थिती असते. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जातो.
*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com