Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

वडार समाजातही अधिकारी घडवणार-सुरेश पोहार

जालना- जो वडार समाज रक्ताचे पाणी करून दुसऱ्यासाठी झिजतो तोच वडार समाज आज विकासापासून कोसो दूर आहे. या समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणून राजकीय लोकाश्रय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती” मी वडार महाराष्ट्राचा” या संघटनेचे नूतन जिल्हाध्यक्ष सुरेश पोहार यांनी दिली.

मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले यांच्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीला संपर्कप्रमुख म्हणून विष्णू पवार यांची उपस्थिती होती.

तर याच बैठकीत वडार समाजाचे जालना जिल्हाध्यक्ष म्हणून खाजगी शिकवणी चालक सुरेश पोहार यांची निवड करण्यात आली. जिल्हाभरातील वडार समाजाचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. दरम्यान यावेळी बोलताना सुरेश पोहार म्हणाले की अंग मेहनती मध्ये कुठेही वडार समाज कमी पडत नाही, मात्र केवळ संख्येच्या तुलनेत कमी असल्यामुळे या समाजाचा आवाज सामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या जात नाही. परंतु काळाच्या ओघांमध्ये आता हळूहळू हा समाज देखील जागृत आणि सुशिक्षित होत आहे. त्याला आणखी गती देण्याची गरज आहे. म्हणूनच या समाजातील विद्यार्थ्यांसाठी विशेष शिकवणीही घेतल्या जाणार आहेत. हळूहळू या समाजात आता अधिकारी देखील तयार होत आहेत, आणि पारंपारिक ढोर मेहनतीला फाटा देऊन शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत. शिक्षणाच्या प्रवाहासोबतच समाजाचा विकास घडवून आणण्यासाठी राजआश्रय देखील महत्त्वाचा आहे. त्यामुळे भविष्यात निवडणुका जरी तोंडावर असल्या तरी निवडणुका आणि समाज संघटना या दोन्हींची कोणतीही सांगड घातल्या जाणार नाही. केवळ समाजाच्या उन्नतीसाठीच ही संघटना काम करणार आहे. समाजाला एकत्र बांधून विकास कसा करता येईल या दृष्टीनेच प्रयत्न केले जाणार आहेत. या बैठकीला सुधीर पवार, गणेश धनवटे, सुखदेव कुसळकर, किशोर विटेकर, एडवोकेट अशोक जाधव, शिवाजी पवार, आदी समाज बांधवांची उपस्थिती होती.

*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button