Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

आता.. जिल्हा रुग्णालयातही आयसीयू ची सुविधा

जालना-आता सामान्य रुग्णाला आयसीयू वाचून तडफडण्याची गरज नाही, कारण सामान्य रुग्णालयात देखील असामान्य सुविधा मिळायला सुरुवात होत आहे, आणि एखाद्या खाजगी हॉस्पिटल प्रमाणेच जालना येथे असलेल्या शासकीय रुग्णालयात वीस खाटांचे अत्याधुनिक अतिवदक्षता विभाग म्हणजेच आयसीयू पुढील पंधरा दिवसांमध्ये सुरू होत आहे.

सामान्य रुग्ण आयसीयू मध्ये भरती करण्यापूर्वी खिशाचा अंदाज घेण्याची वेळ आता येणार नाही. याचा परिणाम रुग्ण पैशाअभावी तडफड न करता चांगला उपचार मिळून ठणठणीत बरा होण्यासाठी मदत होणार आहे.


सामान्य रुग्णालयाच्या इमारतीमध्ये नवीन मॉड्युलर आयसीयू उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे, पुढील पंधरा दिवसांमध्ये ही सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध होईल अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी दिली आहे. सुमारे 20 रुग्णांसाठी इथे व्यवस्था केली जात आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये काही दुर्घटना घडली तर रुग्ण आणि नातेवाईकांना आयसीयूच्या बाहेर पडण्यासाठी एक वेगळा मार्गही तयार करण्यात येत आहे. त्यामुळे सामान्य रुग्णांना खाजगी रुग्णालयातील सर्व सुविधांप्रमाणेच इथे देखील सर्व सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास डॉ. भोसले यांनी व्यक्त केला आहे.

 

*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button