नदीच्या पुरातून प्रवास करताना आजीबाईंची घाबरगुंडी
जालना- जालना तालुक्यातील धारकल्याण परिसरात आज दुपारी दोन नंतर अचानक पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकरी आपापल्या घराकडे वळू लागले, मात्र रस्त्यामध्ये असलेल्या नदीला मोठा पूर आला होता. त्यामुळे अनेक शेतकरी नदीच्या पलीकडेच अडकून पडले. गावातील काही तरुणांना पुलावरून पाणी वाहण्याचा अंदाज येत होता त्यामुळे त्यांनी काही ज्येष्ठ शेतकऱ्यांना हाताशी धरून नदीच्या दुसऱ्या काठावर आणून सोडले. यावेळी म्हाताऱ्या आजी नदीच्या दुसऱ्या काठावर उभ्या होत्या, आणि त्यांनी पुराचे पाणी वाहताना पाहिले होते. मात्र दुसऱ्या काठावर जाण्याची हिंमत होत नव्हती. गावातील काही तरुणांनी त्यांना उचलून वाहत्या पाण्यातून दुसऱ्या काठावर आणून सोडले. यादरम्यान या आजीबाईंची मात्र चांगलीच घाबरगुंडी उडाली होती.
समोर पाण्याचा प्रचंड वेग पाहून त्यांनी डोळे बंद करून घेतले आणि या तरुणांच्या मदतीने कसातरी काठ ओलांडला.दरम्यान या पुराच्या पाण्यामुळे परिसरातील सात- आठ गावचा संपर्क तुटलेला आहे. रात्रीतून पाणी नाही उतरले तर उद्या देखील शेतकरी बांधवांची चांगलीच दैना होणार आहे.
*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com