संकटांनाच गुरु माना; ते आपल्यासाठी संधी घेऊन येतात -उद्योगपती डॉ. भावेश भाटिया
जालना-
“होके मायूस न कभी ढल जाना, श्याम के अंधेरी की तरह|”
जीवन एक सुबह है रोज उगते रहो!
जीवनात संकट ही फक्त त्रासदायक नाहीत तर ती आपल्यासाठी अनेक नव- नवीन संधी घेऊन येतात. त्यामुळे संकटांनाच गुरु माना आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आणखी नव्या जोमाने काम करा. जेवढा जास्त त्रास होईल तेवढी जास्त प्रेरणा त्या कामातून मिळेल असा माझा विश्वास आहे आणि तो सार्थ ठरत आहे. असा स्व अनुभव सांगितला आहे आंतरराष्ट्रीय व्याख्याते आणि स्वतः अंध असूनही इतरांच्या आयुष्यात प्रकाश देवत ठेवण्यासाठी महाबळेश्वर येथे सुरू करण्यात आलेल्या सनराइज कॅन्डल्स चे संस्थापक डॉक्टर भावेश भाटिया यांनी.
जालना जिल्ह्यातील नामवंत असलेल्या देवगिरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या 33 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने डॉक्टर भाटिया हे जाळण्यात आले होते पतसंस्थेच्या सभासदांच्या पाल्यांनी विविध क्षेत्रात संपादन केलेल्या यशाचं कौतुक डॉक्टर भाटिया यांच्या हस्ते प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आले यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते व्यासपीठावर देवगिरी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष राजू भालेराव सचिव परेश बागवे , उपाध्यक्ष संध्या मगरे विक्रम टी प्रोसेसिंग चे अध्यक्ष भावेश पटेल यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती जगभरामध्ये 61 देशांमध्ये जाऊन संकटावर मात करून पुढे कसं जायचं अशा सकारात्मक विचारांची पेरणी करणारे व्याख्याने डॉक्टर भाटिया त देतात स्वतःच्या अंधत्वावर मात करत त्यांनी सुमारे साडेनऊ हजार अंध व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून दिला आहे प्रकाशमान करणाऱ्या विविध वस्तूंच्या माध्यमातून त्यांनी या अंध व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून दिला आहे डॉक्टर भाटिया यांच्या अनुभवानुसार ते म्हणाले प्रत्येकाने स्वतःसाठी काम करतच इतरांसाठी ही काम केले पाहिजे आपण काम मागणाऱ्या न होता काम देणारे झालं पाहिजे आणि संकट ही सर्वच क्षेत्रात असतात ती सर्वांनाच येतात परंतु एखादी स्प्रिंग ज्याप्रमाणे दाबल्यानंतर ती आणखी प्रसरण पावते तशाच पद्धतीने एक संकट आलं तर त्याच्यासोबत हजारो संधी उपलब्ध होतात त्यामुळे संकटांना कधीही घाबरू नका संकटांना एक संधी समजा आणि ही संकटे आपल्याला पाडण्यासाठी नाही तर आपण पडलेले आहोत म्हणून उठवण्यासाठीच येतात असे समजून कामाला लागले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही असेही ते म्हणाले देवगिरी नागरी सहकारी पतसंस्थेबद्दल गौरव गार काढताना डॉक्टर भावेश भाटिया म्हणाले की ही पतसंस्था म्हणजे धर्माचं काम करत नाही तर कामालाच धर्म मानून काम करते म्हणून गेल्या 33 वर्षांपासून अविरत आणि विस्तारित होत आहे.
*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com