Jalna Districtजालना जिल्हा

रानडुकराची शिकार करायला गेलेला तरुण स्वतः झाला शिकार

परतूर-
सकाळच्या वेळी रानावनात मोकाट फिरणाऱ्या रानडुकराची शिकार करण्यासाठी गेलेल्या तिघा जणांपैकी एक व्यक्ती स्वतःच शिकार होण्याची वेळ आज सकाळी आली. दरम्यान डोक्यामध्ये गोळी लागल्यामुळे या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच जीवन महादेव जाधव या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे

आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घनसावंगी तालुक्यात काकडे कंडारी येथे राहणारे ज्ञानेश्वर हनुमान गायकवाड, वैभव बंडू राऊत आणि जीवन महादेव जाधव हे तिघेजण एम एच 21 बीके 41 48 या मोटरसायकल वरून रानडुकराची शिकार करण्यासाठी जात होते. दरम्यान हातडी गावाकडे जात असताना संयोजना हातोडी या रस्त्यावर काकडे कंडारी टी पॉइंट जवळ या तिघांच्या पाठीमागून आणखी एक काळ्या रंगाची बुलेट दुचाकी आली. या दुचाकी वर तीन अनोळखी इसम बसलेले होते. त्यापैकी सर्वात मागे बसलेल्या एका इसमाने त्याच्याजवळ असलेल्या पिस्टल मधून गोळी झाडली ही गोळी जीवन महादेव जाधव यांना लागली आणि ते जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान जीवन जाधव यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी परतुर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सकाळीच परतुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कोठावळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

Related Articles