इनर व्हीलच्या “सेन्ट्रा फेस्ट” ला प्रतिसाद
जालना-इनरव्हील क्लब ऑफ जालनाच्या “सेंट्रा फेस्ट” या खरेदी महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जालना शहरात रविवारी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या क्लबच्याअध्यक्षा अनघा देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून याची तयारी सुरू केली होती.
दरम्यान दरवर्षी होणारा सेंट्रा फेस्ट हा खरेदी उत्सव मागील दोन वर्षांपासून कोरोना काळामुळे झालेला नव्हता. या दोन्ही वर्षांचा उत्साह यावर्षी झालेल्या या कार्यक्रमातून पाहायला मिळाला. विशेष करून महिलांशी निगडित असलेल्या या कार्यक्रमांमध्ये आरोग्य, खाद्यपदार्थ, शालेय आणि वैज्ञानिक विषयाशी निगडित असलेले स्टॉल, देखील इथे उपलब्ध होते.
अरुणिमा फाउंडेशन च्या धनधान्याच्या स्टॉलवर विशेष गर्दी होती. शेतकरी बांधवांनी शेतामध्ये रासायनिक खत न वापरता नैसर्गिक पद्धतीने उत्पादन केलेल्या गहू ज्वारी आणि इतर कडधान्याचा हा स्टॉल होता. ही सर्व शेतीतील उत्पादने रासायनिक खत विरहित असल्याची माहिती अरुणिमा फाउंडेशन च्या वतीने देण्यात आली. तसेच ग्रामीण भागातील महिलांना जोडधंदा मिळावा या हेतूने येथे खमंग धपाटे ही उपलब्ध करून देण्यात आले होते.
खरंतर महिलांचा कार्यक्रम म्हटल्यावर विज्ञानाचा काही फारसा संबंध येत नाही परंतु “बूस्ट युवर इमॅजिनेशन हे ब्रीदवाक्य घेऊन नर्सरी ते इंजीनियरिंग पर्यंत रोबोटिक आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण देणारे रोबोटिक्स सेंटर देखील इथे पाहायला मिळाले .
जालना शहरासह राज्यातील विविध भागातील विक्रेत्यांनी आपले स्टॉल इथे लावलेले होते. दिवसेंदिवस वाढत जाणारे आजार आणि त्यावर आयुर्वेदिक पद्धतीने केलेजाणारे उपचार हे सर्व सामान्य रुग्णांपर्यंत पोहोचविण्यासाठी माधवबागचाही स्टॉल इथे पाहायला मिळाला.
यामधून मिळणारे उत्पन्न हे गरजू परिवारासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी वापरल्या जाते अशी माहिती इनरव्हील क्लब ऑफ जालना च्या अध्यक्षा अनघा देशपांडे यांनी दिली.
*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com