विद्यार्थ्यांमध्ये संचारली देशभक्ती
जालना-संपूर्ण भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे आणि हा उत्साह जालनेकारांमध्ये देखील संचारलेला आहे.
या उत्साहात आणखी भर घालण्यासाठी आज जालना शहरातील सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून आपल्या घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड जोश होता, घोषणा तर होत्याच मात्र त्यासोबत विविध वेशभूषा देखील विद्यार्थ्यांनी केलेल्या होत्या. सकाळच्या वेळी सुरू झालेल्या घोषणांनी आसमंत दुमदुमला होता 15 ऑगस्ट ला अजून वेळ असताना आजच या घोषणा कशा?हे पाहण्यासाठी अनेक नागरिक सकाळी आठ वाजेच्या सुमारास डोळे चोळत- चोळत गच्चीवर आले होते. विद्यार्थ्यांमध्ये न भूतो न भविष्यती असलेला हा आत्मविश्वास, त्यांच्यामध्ये असलेला हा उत्साह जालनेकारांनी अनुभवला आहे.
आणि तो तुम्हालाही अनुभवायचा असेल तर व्हिडिओ पहावा लागेल.
*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com