सुट्टीच्या दिवशीही काम; पोस्टमनला मिळाली बहीण

जालना- नोकरीला केवळ नोकरी न समजता सामाजिक बांधिलकी म्हणून जर ती केली तर निश्चितच पदरात काहीतरी अधिक पडतेच, आणि आपल्यामुळे जर इतरांचा आनंद द्विगुणीत होत असेल तर ! याचा प्रत्यय आला आहे मुख्य पोस्ट कार्यालयात कार्यरत असलेल्या पोस्टमन अरविंद गोमटे यांना. राखी पौर्णिमेच्या निमित्ताने कर्तव्य बजावत असताना एक बहीणही त्यांना मिळाली आहे.
त्याचे झाले असे की, आज गुरुवारी राखी पौर्णिमेचा सण आहे, आणि त्यानिमित्त भारतभर बहिणींच्या राख्या भावाकडे पोस्टाच्या माध्यमातून जात आहेत. परंतु 9 तारखेला मोहरम ची सुट्टी होती आणि दहा तारखेला पोस्टाचे कर्मचारी संपावर जाणार होते आणि अकरा तारखेला राखी पौर्णिमेला या राख्या भावांना मिळतीलच याची खात्री नव्हती, म्हणून पोस्टमन अरविंद गोमटे यांनी सुट्टीच्या दिवशी देखील काम केले आणि या राख्या वेळेत बहिणींकडे पोहोचविल्या. खरंतर कामाच्या व्यापामुळे या राख्या मागेपुढे पोहोचल्या असत्या तरी देखील कोणी या पोस्टमनला विचारणारं नव्हतं, मात्र एक सामाजिक बांधिलकी आणि सणाचं महत्त्व लक्षात घेऊन आणि त्यालाच शासनाने वेळेत राख्या पोहोचवा! आणि सण साजरा करण्यास मदत करा असे दिलेले निर्देश या तिन्हींचा संगम करत अरविंद गोमटे यांनी गायत्री नगर मध्ये राहणाऱ्या स्नेहा जोशी यांच्या घरी पोस्टमन म्हणून आवाज दिला. सुट्टीच्या दिवशी हा आवाज कसा? असा प्रश्न त्यांनाही पडला परंतु त्यानंतर पोस्टमनने दिलेल्या राख्या पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू आणि आनंद अधिकच फुलले. या सुवर्णसंधीचा फायदा दोघांनीही घेतला आणि एक नवीन बहीण भावाचं नातं जोडल्या गेलं. अरविंद गोमटे यांना बहिण मिळाली आणि स्नेहा जोशी यांना भाऊ मिळाला .यापूर्वी ना कधी नावाची ओळख न कधी चेहऱ्याची पारख, मात्र पोस्टमनच्या या कर्तव्यदक्षतेमुळे बहीण भावाचं नातं आणखी एकनवीन नात तयार झालं, दृढ झालं. वेळत राख्या आल्यामुळे स्नेहा जोशी यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला, त्यांच्यासोबतच त्यांच्या शेजारी असलेल्या महिलांना देखील या राख्या वेळेत मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांना देखील याचा आनंद झाला . आणि पोस्टमनच्या सोबत असलेल्या त्यांच्याही सहकार्यांना राखी बांधली. केवळ कामाला फक्त उपजीविकेचे साधन न मानता ती आपली जबाबदारी आहे बांधिलकी आहे असे समजले तर अपेक्षेपेक्षा पदरात निश्चित जास्त पडते ,अशी प्रतिक्रिया पोस्टमन अरविंद गोमटे यांनी दिली .
स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने शासनाने कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी वेळेत राख्या पोहोचवा! असे निर्देशदिल्यामुळे राखी वेळेवरआली त्या मुळे स्नेहा जोशी यांनी देखील पोस्टमनचे आभार मानले आहेत, आणि त्यांना राखी बांधून भावाच्या बंधनात बांधून ठेवले आहे.
*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com