Jalna Districtजालना जिल्हा

गवळी समाजाने केला पोलीस प्रशासनाचा निषेध

जालना- जिल्हा पोलीस प्रशासन वारंवार गवळी समाजावर अन्याय करत असून या समाजाच्या सणावारांवरच जाणून-बुजून बंधने घालत आहे. असा आरोप गवळी समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केला.

गवळी समाजामध्ये राखी पौर्णिमेनिमित्त पंधरा दिवस अगोदर दांडिया खेळण्याची जुनी परंपरा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने वायू प्रदूषण 2002 मध्ये निर्णय दिला. त्याचा गैरवापर पोलीस करत आहेत ,आणि त्या आधारेच गवळी समाजामध्ये सुरू असलेल्या चालीरीती आणि परंपरांनाबाधा निर्माण करत आहेत .असाही आरोपही त्यांनी केला. दरम्यान या कार्यक्रमांमध्ये ध्वनी प्रदूषण होत नाही कारण ध्वनिक्षेपकाचा वापरच केला जात नाही, असे असताना देखील जागा बदलण्याच्या सूचना, वेळेचे बंधन अशा अनेक अडचणी पोलीस प्रशासन गवळी समाजावर लादत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाचा गवळी समाज निषेध करत आहे असेही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेला गवळी समाजाचे गणेशलाल चौधरी, मदन भगत, किशोर जांगडे, कचरू भगत अभय कुमार यादव, चंपालाल भगत यांची उपस्थिती होती.

*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

Related Articles