Jalna Districtजालना जिल्हाराज्य

आ. विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाची पोलिसांनी दिलेली अधिकृत माहिती

*आदरणीय सर/ मॅडम,*

*अपघात ठिकाण व वेळ*-: आज दि.13/08/2022 रोजी पहाटे 05.05 वा. चे सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे मुंबई लेनवर किमी नं.km15/900 येथे रसायनी पोलीस ठाणे हद्दीत प्राणांतिक अपघात घडलेला आहे.

* प्राणांतिक अपघात*

*अपघातातील वाहन*
1) फोर्ड Endeavour क्र.MH 01 DP 6364

*अपघातचे कारण-*:-नमूद वेळी व तारखेस फोर्ड Endeavour MH 01 DP 6364 चालक एकनाथ कदम हे मा. विधान परिषदेचे आमदार विनायक मेटे(केज-बीड) यांना घेऊन मुंबई बाजूकडे दुसरे लेनने जात असताना कार चालक यांचा त्यांच्या गाडीवरील त्यांचा ताबा सुटून पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला ठोकर मारून अपघात झाला आहे. सदर अपघातात आमदार विनायक मेटे हे अत्यंत गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ आयआरबी ॲम्बुलन्स एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचारा कामी दाखल केले असता डॉ.धर्मांग यांनी तपासून मयत घोषित केले आहे. व बाॅडीगार्ड पोलिस हवालदार राम ढोबळे हे कारमध्ये अडकल्याने कारमधून बाहेर काढून आय आर बी रुग्णवाहिकेने तात्काळ MGM हॉस्पिटल,कामोठे येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. कार आयआरबी क्रेनच्या साह्याने रस्त्याचे बाजूला घेतली आहे. सदर वेळी आम्ही व PSI चव्हाण साहेब तसेच रसायनी पोलीस स्टेशन api बालवडकर व स्टाफ तसेच irb चे नवनाथ गोळे आणि स्टाफ हजर होते.सदर अपघाताची माहिती रसायनी पोलीस स्टेशनला दिली आहे.

*माहिती मिळाली* -05.58
*रवाना* – 05.58
*पोहोचलो* – 06.05
*कारवाई पूर्ण*-07.10

*अंतर*- म.पो.केंद्र. पळस्पे पासून 06.400की मी

*गणेश बुरकुल*
*प्रभारी अधिकारी*
*महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे*

†***†**********

*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button