ओठांवर देशभक्ती गीत असेल तर सुवर्णकाळ दूर नाही- विनायकराव देशपांडे
जालना-“एखाद्या देशाचा सुवर्णकाळ हा तेथील नागरिकांवर अवलंबून असतो. ज्या देशातील नागरिकांच्या ओठावर देशभक्तीचे गीत असेल , त्या देशाचा सुवर्णकाळ हा दूर नाही असे समजायला हरकत नाही”. असे मनोगत विनायकराव देशपांडे उर्फ मामा यांनी व्यक्त केले आहे.
बालपणापासूनच हिंदुत्ववादी संघटनांमध्ये वाढलेले आणि विशेष करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भट्टीत तावून सुलाखून निघालेल्या विनायकराव देशपांडे यांचा मंगळवार दि 16 रोजी सम्यक परिवाराच्या वतीने अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. 11 ऑगस्ट 1947 ला जन्म झालेल्या श्री देशपांडे यांचा नुकताच 75 वा वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्य डॉ. पद्माकर सबनीस यांनी विनायकराव देशपांडे यांची घेतलेली ही विशेष मुलाखत.
दरम्यान मुलाखतीमध्ये बोलताना,श्री. देशपांडे यांनी वकील होण्याची इच्छा होती असे मनोगत व्यक्त केले. खरं म्हणजे वकील म्हटलं की अंगावर काळा कोट आला. ती जरी इच्छा पूर्ण झाली नाही तरी डोक्यावर संघाची काळी टोपी मात्र त्यांनी घालून घेतली .त्यांची वकील होण्याची इच्छा चिरंजीव विपुल देशपांडे यांनी पूर्ण केली.
दरम्यान त्यांच्या 75 वर्षाच्या आयुष्यातील चढउतार, खाचखळगे, शिक्षण घेताना आलेल्या अडचणी, हिंदुत्वाचे विचार आणि देश प्रेम विषयीच्या त्यांच्या भावना, एवढेच नव्हे तर शिक्षकाचे कार्य पार पडत असताना स्वतःचा ” पिंजरा” न होऊ देता तर कौटुंबिक जीवनही जाणून घ्यायचे असेल तर डॉ. सबनीस यांनी घेतलेली मुलाखत पाहिलीच पाहिजे.
*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com