केज तालुक्यात अपघात स्विफ्ट मधील सहा जण जागीच ठार
बीड- बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या मांजरसुंबा पाटोदा रस्त्यावर आयशर आणि शिफ्टच्या झालेल्या अपघातामध्ये सहा जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी सात वाजता घडली.
हा अपघात एवढा भीषण होता की स्वीफ्ट गाडी काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली.
पुणे येथून केज तालुक्यातील जीवाचीवाडी येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी स्विफ्ट डिजायर कार क्रमांक एम. एच. 12- 97 61 ही जात होती. त्याच दरम्यान समोरून येणाऱ्या आयशर क्रमांक एम एच -26-ए -5945 या दोघांची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातामध्ये आयशर आणि दुभाजक यामध्ये कारचा चेंदामेंदा झाला. कार मधील सहा जण जागीच ठार झाले आहेत. पोलिसांनी आणि परिसरातील नागरिकांनी अपघाताच्या ठिकाणी ताबडतोब धाव घेतली मात्र स्विफ्ट एवढ्या विचित्र पद्धतीने अडकलेली होती की त्यामधील मृतदेह बाहेर काढणे अशक्य होते. त्यामुळे क्रेनची मदत घ्यावी लागली.
*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com