घनसावंगी पोलीस ठाण्यात 80 जणांचे रक्तदान
घनसावंगी-पोलीस ठाणे अंतर्गत भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 80 रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्याला हातभार लावला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले तर प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांची उपस्थिती होती. तसेच नगराध्यक्ष पांडुरंग कसले, सभापती कल्याणराव सपाटे यांचीही उपस्थिती होती.
पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये 80 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. या रक्तदानाचे औचित्य साधून ठाणे अंमलदार योगेश गायके यांनी आपल्या कलागुणांना वाव दिला आहे, आणि भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त एक गाणं देखील रचलं आहे. पोलिसांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाबद्दल परिसरातून समाधानही व्यक्त केले जात आहे.
*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com