शंभर फूट उंचीवर फडकत आहे जालना जिल्ह्यातील पहिला “तिरंगा”
जालना- 100 फूट उंच गगनाला गवसणी घालणाऱ्या पहिल्या तिरंग्याचे ध्वजारोहण केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आज झाले. यावेळी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, आ. नारायण कुचे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल, पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्यासह माजी आमदार अरविंदराव चव्हाण, डॉ. राजेंद्र राख, डॉ. प्रकाश शिगेदार आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मंत्री दानवे यांनी यावर्षी घर -घर तिरंगा या अभियानाविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच पुढील पिढीला मागचा इतिहास काळावा या हेतूने देखील घरघर तिरंगा पोहोचविण्याचा उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान मराठवाड्यामध्ये 15 ऑगस्ट 26 जानेवारी आणि 17 सप्टेंबर हे तीनच दिवस ध्वजारोहणाचे माहीत होते. मात्र आता घरघर तिरंगा पोहोचल्यामुळे आपल्या पूर्वजांचा इतिहास घराघरापर्यंत पोहोचलेला आहे, असे ते म्हणाले.खरंतर मराठवाड्याला 17 सप्टेंबर 1948 ला स्वातंत्र्य मिळाले. इतर राज्याच्या तुलनेत एक वर्ष दोन दिवसानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि निजामाच्या राजवटीतून मुक्त झालो असल्याचेही त्यांनी सांगितले.या सोबत अशाच पद्धतीचा आकाशामध्ये डोलाने फडकणारा आणि याही पेक्षा जास्त उंचीचा राष्ट्रध्वज कुठे उभारता येईल? याची देखील जिल्हाधिकाऱ्यांसोबत बसून माहिती घेणार असल्याचेही ते म्हणाले.
*एम.डी. पोहनेरकर*
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com