वाऱ्यामुळे नव्हे तर सैनिकांच्या श्वासामुळे फडकतो तिरंगा
जालना-“वाऱ्यामुळे नव्हे तर सैनिकांच्या श्वासामुळे फडकतो तिरंगा” असे ठणकावून सांगणारे रांगोळी सामान्य रुग्णालयात सर्वांचेच लक्ष वेधत होती.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सामान्य रुग्णालय असे सजवले होते की ते “असामान्य “दिसायला लागले. त्यामुळे एक नवीन उत्साह सर्वांमध्ये संचारलेला होता. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने रुग्णालयाच्या परिसरात सजावट केलेली होती रंगीत फुगे, सेल्फी पॉईंट, खेळण्याची सजावट हे तर होतेच मात्र रुग्ण तपासणी ठिकाणाच्या समोरच काढलेली रांगोळी सर्वांचेच लक्ष वेधत होती.याच कार्यालयातील कर्मचारी दीपक भाले यांची कन्या दिपाली भाले हिने रांगोळीच्या माध्यमातून झाशीची राणी साकारली होती.त्यामध्येच हे ठणकावून सांगितले होते.
हे सांगत असतानाच कैदी देखील माणूसच आहे! त्याच्यावरही योग्य उपचार केले गेले पाहिजेत या हेतूने रुग्ण तपासणी कक्षाच्या बाजूलाच कैद्यांसाठी देखील वेगळी व्यवस्था केली आहे. या कक्षाचे उद्घाटनही करण्यात आले आहे. खरं तर इथे कैदी येऊच नयेत, अशी अपेक्षा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी व्यक्त केली आहे परंतु कदाचित आलेच तर त्यांना माणुसकीच्या भावनेतून योग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असेही त्यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर घोडके यांची ही उपस्थिती होती.
*एम.डी. पोहनेरकर*
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com