जिल्ह्यात 49 अधिकृत दहीहंड्या फुटणार!
जालना- जिल्ह्यामध्ये 49 ठिकाणी अधिकृत म्हणजेच शासनाची परवानगी घेऊन दहीहंड्या फुटणार आहेत. या संदर्भात कोणतीही आपत्ती उद्भवू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
पोलीस ठाणे व्यतिरिक्त देखील अतिरिक्त कुमक तयार ठेवण्यात आली आहे.यामध्ये 10 अधिकारी 166 पोलीस अंमलदार आणि 250 गृह रक्षक दल म्हणजेच होमगार्ड यांचा समावेश आहे.जालना शहरांमध्ये 23 आणि चंदनजीरा येथे पाच अशा एकूण 28 दहीहंड्या ह्या फक्त जालना शहरातच फुटणार आहेत. उर्वरित दहीहंडामध्ये बदनापूर दोन, अंबड सहा, घनसावंगी चार, मंठा सहा, आष्टी एक ,आणि भोकरदन दोन, दोन अशा एकूण 49 दहीहंड्या फुटणार आहेत, दरम्यान या सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या अटी संबंधित दहीहंडी चे मंडळ पूर्ण करील याआधीन राहून या परवानगी देण्यात आल्या आहेत, त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही बालगोपाळाचे वय 18 पेक्षा कमी नसावे, चार थराच्या वर दहीहंडी नसावी, गोपाळाने हेल्मेट घातलेले असावे ,सीट बेल्ट लावलेला असावा, त्यासोबत मनोरा पडल्यानंतर कोणतीही इजा होऊ नये म्हणून गाद्या देखील टाकलेल्या असाव्यात आदी अटींचा समावेश आहे.
*एम.डी. पोहनेरकर*
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com