उद्योगपती आणि व्यावसायिकांनी मागितली सामूहिक भिक्षा

जालना -रोज सूट -बूट, घालून, व्यवसाय करणारे उद्योगपती, व्यापारी नव्हे तर शालेय विद्यार्थी देखील आज नवीन जालन्यात साधूच्या वेशात दिसले. त्यामुळे सामान्य माणसांसाठी हा एक आश्चर्याचा प्रकार होता. परंतु माहिती घेतल्यानंतर असे लक्षात आले की, ही जैन समाजाची “सामूहिक भिक्षु दया” आहे. एकाच वेळी चार-पाच जणांच्या समूहाने इतरांच्या घरी जाऊन भिक्षा घेणे आणि तीही फक्त अन्नाच्या स्वरूपात. कोणत्याही प्रकारची आर्थिक किंवा देणगी स्वरूपात ही भिक्षा घेतल्या जात नाही केवळ पोटाला पुरेसे होईल एवढेच अन्न स्वीकारल्या जाते. आणि मिळालेली भिक्षा पुन्हा. गुरूंच्या सानिध्यात येऊनच भक्षण केली जाते.
जालना शहरांमध्ये जैन समाजाचे आराध्य दैवत श्री गणेश लालजी म.सा. यांची समाधी आहे. त्यामुळे जालना शहराला एक वेगळंच वलय प्राप्त झालेलं आहे. बाराही महिने इथे जैन समाजाच्या साधुसंतांची, ऋषीमुनींची उठ बैस असते. फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर परराज्यातीलही समाज बांधव इथे येतात . सध्या तर चातुर्मास चालू आहे. त्यामुळे या दिवसांना वेगळेच महत्त्व आहे. त्यानिमित्ताने आज जैन समाजाच्या सुमारे 122 उद्योगपती ,व्यापारी आणि विद्यार्थ्यांनी “सामूहिक भिक्षु दया” मागितली .
*भिक्षु दया म्हणजे काय?* वर्षातून एकदा तरी ऋषिमुनींप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करणे त्यांनी केलेला त्याग ,धर्मासाठीचे समर्पण, आणि प्रत्यक्षात कशी उपजीविका चालवतात, या सर्वांचा अनुभव घेणे,आणि साधूंच्या प्रति आदर व्यक्त करणे. खरंतर बारा किंवा 24 तासात ऋषीमुनी होणं शक्य नाही. परंतु त्याचा काही अंशी अनुभव तरी यावा या उद्देशाने या भिक्षू दयेच आयोजन केल्या जातं. ज्यांनी ही भिक्षुदया मागितली आहे, त्यांनी रात्रीचे जेवण करू नये, ब्रह्मचर्याचे पालन करावे, महिलांना स्पर्श करू नये, भिक्षा( जैन समाजामध्ये या भिक्षोदेला गोचरी असे म्हणतात) घेताना फ्रिज मधून किंवा गॅस, चुलीवरून अन्न देत असताना जर लाईट आणि पंखा लावला तर ती भिक्षा घेऊ नये. भिक्षा मागत असताना जर कोणी घंटी वाजवत असेल तर त्या घरात जाऊ नये,बीजयुक्त भिक्षा घेऊ नये, मिळालेली भिक्षा सेवन करताना अन्न ताटात सोडू नये, विनाकारण दिवसा झोपू नये, भिक्षा घेण्यासाठी जाताना आली आल्यानंतर गुरूंची वंदना करावी, भिक्षेमध्ये कंदमूळ किंवा कच्च्या भाज्या घेऊ नयेत, त्याच सोबत सोने ,दागिने,मोबाईल घड्याळ या सर्व वस्तू घरी ठेवून याव्यात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही वीज उपकरणाचा उपयोग करू नये असे कडक नियम सांगण्यात आले आहेत.
आजच्या या भिक्षुदेमध्ये डॉ. गादिया, सुदेश शकलेचा कचरू कुंकूलोळ, विजय सुराणा, भरत गादीया,आदींचा समावेश होता.
*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com