पिक कर्ज वाटपात मध्यवर्ती आणि ग्रामीण बँकेचा बोलबाला; इतर बँकांना तंबी
जालना- शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपामध्ये जालना जिल्हा मध्यवर्ती बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या आघाडीवर आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेने 93% तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने 90% उद्दिष्ट पूर्ण केले आहे. उर्वरित बँकांना जिल्हाधिकाऱ्यांनी पीक कर्ज त्वरित वाटप करा अशी तंबी दिली आहे.
जिल्हा समन्वयकांचा संपर्क क्रमांक
दरम्यान आत्तापर्यंत जालना जिल्ह्याचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट 61 टक्के पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी दिली आहे. 1 एप्रिल रोजी खरीप हंगामाला सुरुवात झाली आणि पीक कर्ज वाटपा संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रेषित मोघे आणि त्या त्या बँकांचे जिल्हा समन्वयक यांची दर शुक्रवारी बैठक होते. त्यानुसार जालना जिल्ह्याला 1220 करोड रुपये पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी 12हजार 300 शेतकऱ्यांना 742 करोड रुपयाचे पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे .हे उद्दिष्ट 61 टक्के पूर्ण झाले असून 39 टक्के अद्याप पर्यंत बाकी आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी शासनाने एक पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलमध्ये शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून 1 हजार एकशे शेतकऱ्यांचे वाटप अजून बाकी आहे.
बँक ऑफ बँक ऑफ महाराष्ट्र ने नवीन योजना सुरू केली आहे . जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत त्यांना तात्काळ 50 हजार रुपयाचे पीक कर्ज देणार आहे. दरम्यान जिल्ह्यातील ज्या बँकांनी 40 टक्के पेक्षा कमी पीक कर्ज वाटप केले आहे अशा बँकांना आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठवून हे उद्दिष्ट त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com